क्रिडा परिसवांद (न्यू हायस्कूल- प्रमुख पाहुणे मा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज)

दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू हायस्कूलच्या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त क्रीडा परिसंवाद व माजी ज्येष्ठ खेळाडूंच्या सत्कार💐🌹 समारंभाचे आयोजन संस्थेच्या राम गणेश गडकरी सभागृहात करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे शुभहस्ते क्रीडा परिसंवादाचे उद्घाटन क्रीडाज्योत प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी समारंभाचे अध्यक्ष मा. विनोदकुमार लोहिया व संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष मा. नितीन वाडीकर, अर्जुन पुरस्कार विजेत्या शैलजा साळुंखे, शिवछत्रपती पुस्कार विजेते श्री. अरूण नरके सारे, श्री. एस. व्ही. सुर्यवंशी, डॉ.ज.ल. नागांवकर तसेच संस्थेचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सहसचिव प्राचार्य एस. एस. चव्हाण, सौ. अनिजा सुर्यवंशी, प्रदीप पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.🏆⚽🎾🏑⛳🥋♟️

Scroll to Top