प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये महापौर रूपाराणी निकम यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ व गणवेश वाटप कार्यक्रम उत्साहात
1 August 2026 : कोल्हापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून राम गणेश गडकरी
सभागृहात गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव समारंभ, वाड्मय विहार मंडळाचे उद्धाटन,१०० विद्यार्थिनींनी तयार केलेल्या
वेबसाईट्सचे लोकार्पण तसेच गरजू विद्यार्थिनींना गणवेश व वह्या वाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन प्रशालेच्या वतीने
करण्यात आले होते.
स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सविता पाटील करताना आपल्या मनोगतात उपस्थितांचे स्वागत करत, या शाळेचा
सातत्याने उंचावत असलेला शैक्षणिक दर्जा, शिक्षकांची निष्ठा व गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे पालकांचा वाढता विश्वास यांचा
गौरवपूर्ण उल्लेख केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोदकुमार लोहिया होते
प्रमुख पाहुण्या महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते वाड्मय विहार मंडळाचे उद्धाटन तसेच शाळेतील १०० विद्यार्थिनींनी
स्वतः तयार केलेल्या वेबसाईट्सचे अनोखे लोकार्पण करण्यात आले. विविध शालांत व बाह्य परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश
संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच गरजू विद्यार्थिनींना गणवेश व
वह्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली.
प्रमुख पाहुणे महापौर रुपाराणी निकम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, विद्यार्थिनींना आत्मनिर्भर, आत्मविश्वासू आणि
ध्येयवेडे बनण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात विनोदकुमार लोहिया यांनी द न्यू एज्युकेशन सोसायटी या संस्थेचा गौरवशाली इतिहास सांगत
सकारात्मक विचार, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला.