श्री एस. एस. चव्हाण यांचा गौरव समारंभ :-

सौ. स.म. लोहिया हायस्कूल व ज्यूनिअर काॕलेजचे प्राचार्य व दि न्यू एज्यूकेशन सोसायटीचे सहसचिव श्री एस. एस. चव्हाण यांचा आज झालेल्या गौरव समारंभ उत्सहात :-

गौरव समितीच्या वतीने जाहिर आभार🙏🙏🌹
श्री एस एस. चव्हाण गौरव समारंभ अतिशय भारदस्त व न भूतो न भविष्यतो संपन्न झाला. उपस्थित पाहूणे व त्यांचा श्री. एस एस . चव्हाण यांच्या कार्याप्रती असलेल्या निष्ठेचे सर्वानीच कौतूक केले. मा. आमदार जयंतराव आसगांकर, मा. शरद गोसावी, मा. सुनीलकुमार लवटे, मा. इंद्रजित देशमुख तथा काकाजी, आमचे प्रेरणास्थान आदरणीय मा. विनोदकुमार लोहिया. संस्थेचे अध्यक्ष मा. पद्माकर सप्रे, मा. निर्मल लोहिया,मा.नितीन वाडीकर, मा. नेमचंद संघवी, मा. नरसिंह अस्वले,मा. मकरंद गोधळी, मा. महेश जाधव , मा.किरण लोहार,मा. दादा लाड, अशैक रोकडे, अनेक शासकीय अधिकारी माजी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी शैक्षणिक सामाजिक व सास्कृतिक क्षेञातील मान्यवर विविध संस्थाचे पदाधीकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , मिञमंडळी नातेवाईक, विद्यार्थी या सर्वाच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या सर्वाच्या उपस्थितीने गौरव समारंभ अतिशय उत्कृष्ट झाला. त्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवर व इतर सर्व उपस्थिताचे गौरव समितीच्या वतीने शतशः आभार.
उपस्थित सर्वानी भोजनाचाही आनंद घेतला, श्री राहूल भोसले या आमच्या माजी विद्यार्थ्यांनी भोसले कॕटरर्स यांनी अतिशय मिष्ठान भोजन दिले. त्याचा ही सर्वानी आस्वाद घेतला.
या गौरव समारंस सर्व गौरव समितीचे सदस्य, विविध समिती सदस्य यांनी भरघोस सहकार्य केले त्यामुळेच हा समारंभ यशस्वी झाला, गेल्या दोन ते तीन महिन्यातील विविध उपक्रम समारंभाची तयारी , यात सर्व गौरव समितीने घेतलेले कष्ट वाखाणन्यासारखे आहेत. या सर्वाना स्वागताध्यक्ष या नात्याने धन्यवाद देतो त्यांचे अभिनंदन करतो आणि आभारही मानतो.
या गौरव समारंभाच्या निमित्तानेश्री एस. एस. चव्हाण यांनीही आपल्या उदात्त दातृत्वाने विविध संस्थाना देणगी दिली.यामध्ये दि. न्यू एज्यूकेशन सोसायटीलाही रु दीड लाख रुपये देणगी स्वरुपात कृतज्ञतेपूर्वक देऊ केले त्यांच्या या उदार व स्वेच्छा देगणी बद्दल संस्था त्यांची आभारी आहे.
श्री चव्हाण सर व कुटुंबीयांना यापुढच्या आयुष्यात निरामय आरोग्य व दिर्घ आयुष्य लाभो ही शुभेच्छा व सदिच्छा.!!!!

 

Scroll to Top